मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > जम्मूस जाणार सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जम्मूस जाणार सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ
भाषा
अमरनाथ देवस्थान समितीस जमीन ह्स्तांतरणावरून निर्माण झालेल्या वादावर समाधानासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ शनिवारी जम्मूस भेट देणार आहे. वादग्रस्त प्रश्नावर तोडग्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव आला होता.

गृहमंत्री शिवराज पाटील यांनी परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन सर्व प्रस्तावांवर चर्चा केल्याचे समजते. यावेळी मंत्रिमंडळे सचिव के एम चंद्रशेखर व केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता हेही उपस्थित होते.

यासाठी गृहमंत्रालयाने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिले आहे. जमीन हस्तांतरण प्रश्नावरून आंदोलन छेडणार्‍या श्री अमरनाथ संघर्ष समितीशी हे प्रतिनिधीमंडळ चर्चा करून प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील.
आणखी
नंदीग्राममध्ये नव्याने हिंसेत एक ठार
काश्मिरप्रश्नी इस्लामाबाद परिषदेस सुरूवात
तामिळनाडूत सहा एलटीटीई बंडखोरांना अटक
अमरनाथ प्रश्नी भाजपचे देशव्यापी आंदोलन
अमरनाथ प्रश्नावर तोडग्यासाठी समितीचे गठन
बॉम्‍बस्‍फोटातील संशयितांचे स्‍केच प्रसिध्‍द