मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > हुश्‍श..! अमरनाथ वादावर अखेर तोडगा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
हुश्‍श..! अमरनाथ वादावर अखेर तोडगा
वार्ता
गेल्‍या दोन महिन्‍यांपासून चाललेला अमरनाथ जमीनीचा वाद अखेर आता मिटण्‍याची चिन्‍हे दिसत असून संपूर्ण देशाला वेठीस धरलेल्‍या या वादावर यशस्‍वी तोडगा काढण्‍यात सरकारला यश आले आहे. जम्मू-काश्मीर सरकार आणि श्रीअमरनाथ यात्रा संघर्ष समितीमध्‍ये अमरनाथ जमीन वादावरून चार फे-यांमध्‍ये झालेली चर्चा आज अखेर फळाला आली. चर्चे अंती झालेल्‍या तोडग्‍यानुसार श्री अमरनाथ श्राइन बोर्डाला यात्रेच्‍या काळात जमीन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

सरकारी समितीचे प्रमुख एस.एस.ब्लोएरिया यांनी पहाटे पाच वाजता घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत तोडगा निघाला श्राइन बोर्डास अमरनाथ यात्रे दरम्‍यान जमीन देण्‍याची घोषणा केली.

चर्चेची चौथी फेरी शनिवारी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. ही चर्चा पहाटे चार वाजून 45 मिनटांपर्यंत चालली. या चर्चेअंती अमरनाथ देवस्‍थान समितीला यात्रेच्‍या काळात जमीन वापरण्‍यास देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे महिन्‍यांपासून सुरू असलेला वाद मिटणार आहेत. या यात्रेची सर्वस्‍वी जबाबदारी देवस्‍थान समितीची असणार आहे. तसेच या श्राइन बोर्डाचे अध्‍यक्ष राज्‍याचे राज्‍यपाल असणार आहेत.
आणखी
पूरग्रस्‍तांसाठी मदतीचे हात सरसावले
श्रीनगरमध्‍ये आंदोलकांचा लष्‍करावर हल्‍ला
जम्मूमध्‍ये कर्फ्यू लागू
आरएसएसचा ममतांना पाठिंबा
अण्वस्त्र करारावर मनमोहन-सोनियांची भेट
बिहारमध्ये नाव उलटून अठ्ठावीस ठार