भारत-अमेरिका अणू करारासंदर्भात व्हीएन्नात एनएसजीच्या झालेल्या बैठकीत अत्यल्प प्रगती झाली असून त्यातून फारशे काहीही निष्पन्न झालेले नसल्याचा दावा काही देशांनी केला आहे. शस्त्रास्त्र नियंत्रण संघटनेचे कार्यकारी निर्देशक डॅरिल केम्बेल यांनी सांगितले, की बैठकीच्या पहिल्या दिवशी केवळ काही लहान-मोठ्या मुद्यांवरच चर्चा झाली आहे. मात्र आधारभूत मुद्यांवरील मतभेद अजूनही कायम आहेत.
त्यांनी सांगितले, की एनएसजीच्या अनेक जबाबदार सदस्यांनी भारताला सूट न देण्याचे किंवा दिल्यास जर भारताने अणू चाचणी घेतल्यास करार नष्ट करण्यावर जोर दिला आहे.
|