देशभरातील विविध तुरूंगात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असून एक लाख दहा हजार कैदी क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या तुरूंगात शिक्षा भोगत असल्याचे राष्ट्रीय गुन्हेगार रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालात म्हटले आहे.
या कैद्यांमध्ये कच्चे व विचाराधीन असलेल्या कैद्यांचाही समावेश आहे. केवळ राजधानीतील तुरूंगांत 214.4 टक्के कैद्यांना क्षमता नसलेल्या तुरूगांत ठेवण्यात आले आहे. देशभरात असलेल्या 1336 तुरूंगाची क्षमता दोन लाख 63 हजार 911 इतकी आहे.
पण या तुरूंगात तीन लाख 73 हजार 271 अतिरीक्त कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये तीन लाख 58 हजार पुरूष कैदी असून त्यांचे एकूण प्रमाण 96.1 टक्के आहे. तुरूंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवण्याचे प्रमुख कारण म्हणजे कैद्यांना देण्यात येणार्या पायाभूत सोयीसुविधांचा अभाव व कैद्यांना आवश्यक सेवांची कमतरता पडत असल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.
सन 2005 च्या तुलनेत 2006 मध्ये या कैद्यांची संख्या कमी झाली होती. तेव्हा 145.4 टक्के प्रमाण होते, तर 2006 मध्ये या प्रमाणात घट होऊन ते 141.1 टक्क्यांवर आले होते.
|