उच्च न्यायालयाने बॉलीवूड स्टार संजय दत्तला दक्षिण आफ्रिकेमध्ये शूटिंगसाठी जाण्याची परवानगी दिली असून 20 नोव्हेंबरपर्यत पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिला आहे. मुख्य न्यायाधीश केजी बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयने यापूर्वी संजयला 30 सप्टेंबरपर्यंत पासपोर्ट जमा करण्याच्या सूचना दिल्या होती.
संजयच्या बाजुने वरिष्ट अधिकारी फली एस. नरिमन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय दत्तने 10 एप्रिलचया नियमांचे पालन केले आहे. गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला संजयला जामीन देताना न्यायालयाने त्याला पासपोर्ट सुपूर्त करण्यास सांगितले होते. तसेच विनाअनुमतीने देशाच्या बाहेर जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी शस्त्र बाळगल्या दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर टाडा न्यायालयाने गंभीर आरोपातून त्याची सुटका केली होती.
|