टाटांच्या नॅनो प्रकल्पासंबंधीत मुद्यावर तोडगा काढण्यासाठी झालेली चर्चा अखेर निरर्थक ठरली आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी तृणमूल कॉंग्रेस आणि सरकारी पॅनलमध्ये झालेल्या चर्चेत शनिवारी दूस-या दिवशीही काहीही तोडगा निघू शकला नाही. दोन्ही पक्षांमध्ये याविषयावर पुन्हा चर्चा होणार आहे.
बैठकीनंतर राजभवनातून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की दोन्ही बाजूंनी पुनर्वसन योजना तसेच सिंगूर प्रकल्पाच्या जागेबद्दल चर्चा केली. या प्रकरणातून रविवार किंवा सोमवारपर्यंत यशस्वी तोडगा निघू शकेल अशी राज्यपालांना खात्री आहे.
सिंगूरप्रश्नी तोडग्यासाठी चर्चेला सुरवात
|