मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > बिग बॅंगच्‍या ऊर्जेने पृथ्‍वीला धोका नाहीः शास्त्रज्ञ
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बिग बॅंगच्‍या ऊर्जेने पृथ्‍वीला धोका नाहीः शास्त्रज्ञ
भाषा
विश्‍वाच्‍या निर्मिती संदर्भातील रहस्ये उलगडण्‍यासाठी बनविण्‍यात आलेल्‍या 'एलएचसी' यंत्राच्‍या वापराने पृथ्‍वीला कोणताही धोका नसल्‍याचे शास्‍त्रज्ञांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे गेल्‍या काही दिवसांपासून पृथ्‍वी नष्‍ट होईल अशी व्‍यक्‍त केली जात असलेली भिती खोटी असल्‍याचे सिध्‍द झाले आहे.

विश्‍वाची रचना कोणत्‍या आधारावर झाली याचा शोध घेण्‍यासाठी जगातील काही शास्‍त्रज्ञांनी एकत्र येऊन 60 ते 70 किलोमीटर लांबीचे परखन्‍ली लार्ज हायड्रोजन कोलाइडर (एलएचसी) नावाचे उपकरण तयार केले आहे. या यंत्राच्‍या माध्‍यमातून पृथ्‍वीसह सर्वच ग्रह-ता-यांच्‍या निर्मितीचा शोध लावला जाणार होता.

भारतीय तसेच यूरोपीयन शास्‍त्रज्ञांनी येत्‍या 10 सप्‍टेंबर 2008 रोजी या एलएचसीमधून निघणा-या तीव्र किरणांमुळे आणि ऊर्जेमुळे पृथ्‍वीला कोणताही धोका नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

भारतीय शास्‍त्रज्ञ प्रा.यशपाल यांनी सांगितले, की यूरोपीयन अणू एजन्‍सीच्‍या नेतृत्वाखाली जगातील 80 देशांचे शास्‍त्रज्ञ, इंजीनियर आणि तंत्रज्ञ गेल्‍या 20 वर्षांपासून या यंत्राच्‍या निर्मितीवर कार्य करीत आहेत. त्‍या माध्‍यमातून विश्‍वाच्‍या निर्मितीमागील गुढ उलगडणार आहे.
आणखी
श्रमशक्‍ती एक्‍सप्रेस रुळावरून घसरली
मनमोहनच्‍या नेतृत्‍वाची बूशकडून प्रशंसा
सिंगूर प्रकरणी तोडगा नाहीच
पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करा.
अमरनाथ मुद्यावर पुन्‍हा आंदोलनाचा इशारा
एनएसजीत मंजुरी म्‍हणजे भारताचा विजयः कॉंग्रेस