वाघांच्या अवयवांच्या तस्करीसाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार करणा-यांवर शासनाने प्रखर मोहिम उघडल्यानंतर आता शिका-यांची नजर विबट्याकडे लागली आहे. बिबळ्यांची संख्या वाघांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्या मोठ्या प्रमाणावर शिकार केली जात असल्याची माहिती उजेडात आली आहे.
बिबट्यांची हाडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघांच्या हाडांइतकीच महागडी आहेत. या शिवाय पारंपरिक चीनी औषधींच्या निर्मितीसाठीही त्यांची शिकार केली जात आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे (डब्ल्यूपीएसआय) प्रोग्राम मॅनेजर टीटो जोसेफ यांनी यासदंर्भात माहिती दिली, की चीनी औषधी बनविण्यासाठी वाघांची हाडे उपयोगात आणली जातात. वाघांच्या अवयवांच्या विक्रीतून बिबट्यांच्या अवयवांपेक्षा 20 पट जास्त किंमत मिळते. मात्र वाघांचे प्रमाण घटल्याने आता बिबट्यांना प्राधान्य दिले जात आहे. डब्ल्यूपीएसआयने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी शिका-यांनी 124 बिबट्यांची शिकार केली. तर यंदा ऑगस्टपर्यंत देशभ्ारात 112 बिबटे मारले गेले आहेत.
|