देशात 500 रूपयांच्या नकली नोटांचा होणारा प्रसार रोखण्यासाठी अर्थमंत्रालयाकडून आता विशेष प्रयत्न केले जाणार असून पाचशे रूपयांच्या नोटांच्या छपाईसाठी एक विशेष कागदाच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील हौशंगाबाद येथील सिक्युरिटी पेपर मिलला अर्थ मंत्रालयाकडून या विशेष प्रकारच्या कागदाच्या निर्मितीस मंजुरी मिळाली आहे. या कागदावर 500 रूपयांच्या नोटांची छपाई केली जाणार आहे. या मिलमध्ये चलनी नोटांसाठीचे कागद आणि रेवेन्यु स्टॅम्पच्या कागदांची निर्मितीही केली जात असते.
आतापर्यंत पाचशे रूपयांच्या नोटा बनविण्यासाठी वापरल्या जात असलेल्या कागदाची आयात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि नेदरलॅण्ड येथून केली जाते.
|