मालेगाव स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लेफ्ट.कर्नल पुरोहितांशी आपला काहीही संबंध नसल्याचे आर्ट ऑफ लीव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर यांनी स्पष्ट केले आहे. कोर्सच्या काळात मी रोजच अनेकांना भेटत असतो त्यात पुरोहित असतील तर मला माहीत नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.पचमढी येथे कर्नल पुरोहित यांनी आर्ट ऑफ लीव्हिंगचे एक शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी पुरोहित काय करणार आहेत. हे माहीत असते, तर आध्यात्मिक गुरु या नात्याने आपण पुरोहितांना नक्कीच समजावले असते, असेही त्यांनी सांगितले. पुरोहितांचे हे शिबिर गेल्या महिन्यात 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान झाले होते. मुंबई एटीएसने पुरोहितांना येथूनच अटक केली होती.मालेगाव स्फोटाला दोन वर्ष उलटल्यानंतर केल्या जात असलेल्या खुलाशाच्या मागे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आता लोकसभा निवडणुका येत असल्यानेच ही बाब आता समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. |