जम्मू-काश्मीर विधानसभेच्या दुस-या टप्प्याच्या मतदानास सुरुवात झाली असून सीमेलगतच्या राजौरी जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. येथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळी आठ वाजता मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. येथे दारहल, राजौरी, नौशेरा आणि कालाकोटे या चार विधानसभांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी 59 उमेदवार मैदानात असून त्यांच्या भग्याचा फैसला 3 लाख 56 हजार 318 मतदार करणार आहेत. |