भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान-1 अभियानाच्या यशस्वीतेनंतर आता मंगळग्रहाकडे लक्ष वहविले असून मंगळावरही यान पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. इस्त्रोचे अध्यक्ष जी माधवन नायर यांनी ही माहिती दिली आहे.
नायर यांनी सांगितले, की मंगळ ग्रहाबद्दलचा अन्वेषणात्मक अभ्यास सुरू झाला असून मंगळ ग्रह अभियानाच्या सुरुवातीच्या सर्व तयारी झाली असली तरीही या अभियानासाठी चार वर्ष लागण्याची शक्यता आहे. |