यंदाच्या दिवाळीत लालू नावाच्या खेळण्याचा खप कमी झाला असला तरी प्रसिद्ध सोनपूर यात्रेत लालूंच्या खेळण्यांनी धूम केली आहे.
लालू फटाके, लालू आंबे, लालू रंगानंतर आता बिहारच्या प्रसिद्ध सोनपूर यात्रेत लालू खेळण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील खेळण्यांची नावे 'लालू' असे ठेवले आहे.
या खेळण्यांची हेअर स्टाईल देखील लालूसारखी असून त्यांची किंमतही ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशी आहे. कमी किंमत आणि लालूच्या नावाखाली ही खेळणी विकली जात आहेत. यापूर्वीही अनेक यात्रा आणि बाजारात लालू खेळण्यांनी धूम केली होती.
दुकानदारांच्या मते, लालू खेळणे त्यांच्यासाठी भाग्यशाली सिद्ध झाले आहे. सोनपूर यात्रेत सुरवातीला लालू खेळणी विकत नसल्यामुळे राजदचे नेते नाराज झाले होते. परंतु, सोनपूर यात्रेत त्यांच्या विक्रीने एक उच्चांक गाठल्याने सर्वांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे.
|