मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > जम्मू-काश्मीरमध्ये 45 टक्के मतदान
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जम्मू-काश्मीरमध्ये 45 टक्के मतदान
वार्ता
जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत रविवारी पार पडलेल्या सहा विधानसभेच्या जाग्यांसाठी दुपारपर्यंत 45 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, कंगन विधानसभा मतदारसंघातील नॅशनल पँथर्सचे उमेदवार अब्दूल रशिद गनी यांच्या घराबाहेर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकून हल्ला केला. या हल्ल्यात गनी बालंबाल बचावले.

तसेच, दरहल विधानसभा मतदारसंघात दोन गटात सुरू झालेला संघर्ष मिटविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. दहशतवादी संघटनांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आव्हान केले होते.

या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील कंगन गंधेरवल, नोशेरा, दरहल, राजोरी आणि कालाकोटे विधानसभा मतदार संघात शांततापूर्ण मतदान झाले.

अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. सात टप्प्यात होणार्‍या मतदानाचा दुसरा टप्पा आज पार पडला.
संबंधित माहिती शोधा
आणखी
प्रसिद्ध सोनपूर यात्रेत लालूंच्या खेळण्‍यांची धूम
रशीद म्हणतात पीओके 'आझाद काश्मीर'
आझमगडला दहशतवाद्यांचे गाव म्हणणे चुकीचे- शबाना
भाजपाशी मतभेद नाहीत- तोगडीया
मी गरीबांचे सरकार चालवेल- चिरंजीवी
दिल्ली स्फोटातील आरोपींवर मोक्का लावा- भाजपा