मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > अशोक कामटे यांच्यावर अंत्यसंस्कार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अशोक कामटे यांच्यावर अंत्यसंस्कार
दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेल्या एटीएसचे आयुक्त अशोक कामटे यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी 'कामटेसाहेब अमर रहे' अशा घोषणा देत आपल्या भावनांना वाट करून दिली.

बुधवारी मुंबईत दहशतवाद्यांशी मुकाबला करताना कामटे शहीद झाले. दुपारी पुण्यातील रक्षकनगर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. आपल्या लाडक्या अधिका-याच्या अंतदर्शनासाठी एकच गर्दी उसळली. कामटेसाहेब आपल्यात नाहीत, याच्यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. अनेकांना अश्रू अनावर झाले.

त्यांची बहीण शमिर्ला सराफ दुबईहून पुण्यात पोहचल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला त्यांचे पाथिर्व भव्य मिरवणुकीद्वारे वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. वडील मारूतीराव, पत्नी विनिता, मोठा मुलगा आदी उपस्थित होते. लहानग्या राहुलला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हती. वडिलांचे पाथिर्व पाहिल्यावरचा त्याचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. बंदुकीच्या फै-या झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली आणि त्यांच्यावर अंत्यासंस्कार करण्यात आले. यावेळी विविध संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यर्कत्यांनी 'शहीद अशोक कामटे अमर रहे'च्या घोषणा दिल्या.
संबंधित माहिती शोधा
आणखी
तणावामुळे एकाची आत्महत्या
35 तास उलटले तरी कमांडोंचे ऑपरेशन सुरूच
ओबेरॉयमधून चौदा विदेशी पर्यटक मुक्त
नरिमन हाऊसमधून दहा बंधकांची सुटका
दिल्लीसह‍ देशात हाय अलर्ट लागू
ताजमधून ओलिसांची सुटका, दहशतवादी ठार