एकीकडे मुंबईमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये पाकच्या आयएसआयचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर आता नियंत्रण रेषेवरही पाक सैन्याने गोळीबार सुरू केल्याचे वृत्त असून, गेल्या 24 तासांमध्ये पाक सैन्याने दुसऱ्यांदा शस्त्रसंधी कराचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतीय लष्कराने केला आहे.
एका लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री येथील ताराकुंडी भागात पाक सैन्याने रात्री उशिरा गोळीबार केला. भारतीय सैन्याने मात्र पाक लष्कराला प्रत्योत्तर दिले नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये पाक सैन्याने नियंत्रण रेषवर दुसऱ्यांदा गोळीबार केला असून, यापूर्वी 26 तारखेला पाक सैन्याने गोळीबार केला होता. |