मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > विधीमंडळ अधिवेशन ११ डिसेंबरपासून
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
विधीमंडळ अधिवेशन ११ डिसेंबरपासून
राज्य विधीमंडळाचे नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ऐवजी ११ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शनिवारी मुंबई येथे दिली.

मुंबईतील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची तातडीने बैठक घेण्यात आली. दहशतवादी हल्ल्याला यशस्वीपणे तोंड दिल्यानंतर मदत व पुनर्वसनाच्या कामात सर्व यंत्रणा व्यस्त आहेत.

या सर्व यंत्रणांसोबत मुंबईत असणं गरजेचे असल्याने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांशी यासंदर्भात चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री देशमुख यांनी सांगितले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
पाकचा नियंत्रण रेषेवर गोळीबार
अशोक कामटे यांच्यावर अंत्यसंस्कार
तणावामुळे एकाची आत्महत्या
35 तास उलटले तरी कमांडोंचे ऑपरेशन सुरूच
ओबेरॉयमधून चौदा विदेशी पर्यटक मुक्त
नरिमन हाऊसमधून दहा बंधकांची सुटका