सन 2000 मध्ये कर्नाटकात चार ठिकाणी झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने आज अकरा जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. तर अन्य बारा आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली.
2000 मध्ये कर्नाटकातील गुलबर्गा, हुबळी आणि बंगळुरु येथील चर्चमध्ये तीन बॉम्बस्फोट झाले होते. तर चौथा स्फोट बंगळुरु शहरातील एका मोटारीत झाला होता.
याप्रकरणी न्यायालयाने 34 जणांना दोषी ठरविले असून, त्यापैकी तिघांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला आहे. दोघे जण जामिनावर मुक्त असून, सात जण फरार आहेत.
या खटल्यातील चौघा संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा खटला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चालविण्यात आला. सरकारी वकिलांनी या खटल्याचे ऐतिहासिक असे वर्णन केले आहे. |