मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > राज ठाकरेंना अटक करण्‍याचे आदेश
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राज ठाकरेंना अटक करण्‍याचे आदेश
वेबदुनिया
Raj Thakry
WD
उत्तर भारतीय आणि बिहारींविरोधात वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी जमशेदपूर न्‍यायालयाने राज ठाकरे यांच्‍या विरोधात पुन्‍हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या खटल्‍याची सुनावणी येत्‍या 18 डिसेंबरला होणार असून त्‍यासाठी राज यांनी हजर रहावे अन्‍यथा त्‍यांना अटक करून हजर करावे असे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.

या खटल्‍याच्‍या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्‍याने न्‍यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणी राज यांच्‍या विरोधात यापूर्वीही न्‍यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मात्र राज यांनी मुंबईत खटला चालविण्‍याची मागणी करून माझगाव न्‍यायालयातून काही दिवसांसाठी दिलासा मिळवून घेतला होता. आज या खटल्‍याची पुन्‍हा सुनावणी झाली असून आता त्‍यांना 18 डिसेंबरला जमशेदपूर न्‍यायालयात हजर राहण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.
संबंधित माहिती शोधा
आणखी
सर्वपक्षीय बैठकीस शिवसेना अनुपस्थित
पाटील यांचा राजीनामा मंजूर
दहशतवादाविरोधात लढा देण्याची वेळ-सोनिया
एनएससीएनने केले 28 तरुणांचे अपहरण
'गुप्तचर संस्थांच्या अपयशाने दहशतवाद वाढला'
दहशतवाद रोखण्यात सर्वच पक्षांना अपयश- शंकराचार्य