मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > 'दाऊद, अझहरला भारताच्या ताब्यात द्या'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'दाऊद, अझहरला भारताच्या ताब्यात द्या'
भाषा
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमसह मौलाना मसूद अझहरला आपल्या ताब्यात द्यावे अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.

मुंबईत झालेल्या हल्ल्यांत दाऊदने व मसूद यांनीच लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांना मदत केली असा भारताचा दावा आहे. मसूज दा जैश ए मोहम्मद या संघटनेचा संस्थापक आहे. अझहर याला भारताने पकडले होते. मात्र, १९९९ मध्ये कंदाहार येथे अपहरण केलेल्या विमानातील प्रवाशांच्या बदल्यात त्याला सोडण्यात आले होते.

भारताच्या परराष्ट्र खात्याची आज बैठक झाली. तीत पाकिस्तानाचे भारतातील उच्चायुक्त शाहिद मलिक यांना बोलविण्यात आले व त्यांना दाऊद व अझहर यांना भारताच्या ताब्यात द्यावे असे सांगण्यात आले.

मुंबईवरील हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानविषयी कठोर पवित्रा घेतला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी हात असल्याचे आढळल्यानंतर उभय देशातील शांती चर्चा व परस्पर विश्वास वाढविण्याचे उपाय थांबविण्याचा इशारा भारताने दिला आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
शहीदाच्‍या वडीलांनी मुख्‍यमंत्र्यांना हाकलले
राज ठाकरेंना अटक करण्‍याचे आदेश
सर्वपक्षीय बैठकीस शिवसेना अनुपस्थित
पाटील यांचा राजीनामा मंजूर
दहशतवादाविरोधात लढा देण्याची वेळ-सोनिया
एनएससीएनने केले 28 तरुणांचे अपहरण