प्रेमाचे प्रतीक असलेल्या आग्राचा ताजमहलावर दहशतवाद्यांची काळी नजर पडू नये म्हणून आग्रा प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी दररोज ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेत अजून वाढ आणि मजबूत करण्यासाठी सोमवारी प्रशासनाने पोलिस, पुरातत्व विभाग आणि सीआयएसएफच्या अधिकार्यांची एक संयुक्त बैठक बोलावली होती.
या बैठकीस आग्रा विभागाचे पोलिस महासंचालक जी. पी. शर्मा, डीआयजी एन. के. श्रीवास्तव, जिल्हाधिकारी अनिल कुमार, वरिष्ठ पोलिस अधिक्षक प्रेमप्रकाश यांच्यासह सीआयएसएफ आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी अधिकार्यांनी प्रशासनाला काही प्रस्ताव पाठविण्याचे बैठकीत ताजमहल पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेशसिंह यांनी सांगितले. |