मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी महिलाविषयी विवादास्पद वक्तव्य करून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी वादाच्या भोवर्यात सापडले आहे. भाजपानेच नकली यांच्या विरूध्द बंड फुकारले आहे.
मुंबईत झालेल्या हल्ल्या संदर्भात बोलताना नकली म्हणाले की, मुंबईत अनेक महिला लिपिस्टक व पाउडर लावून विरोध दर्शवत आहेत. तसेच राजकारण्यांना टोला मारत आहेत. लोकशाही प्रति जनतेत असंतोष पसरवण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. हे काम जम्मू व कश्मीरमध्ये अलगाववादी करत आहेत. या वक्तव्यावर भाजपाच्या काही पुढार्यांनी आक्षेप घेतला आहे.
देशावर मोठे संकट कोसळले असताना सर्वपक्षांनी दहशतवादाच्या विरूध्द कंबर कसून एकत्र येण्याची गरज आहे, त्यांच्याशी दोन हात करण्याची वेळ येऊन ठेपली असताना आपणच लोकशाहीच्या विरूध्द वक्तव्य करणे गैर असल्याचे भाजपाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे.
राजीवप्रताप रूडी यांनी नकवी यांच्या वक्तव्यावर उभ्या राहिलेल्या दांगडोवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, नकली यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तीक पातळीवरचे आहे. त्यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही. |