मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > आणखी एक महात्मा गांधी हवे - शेखर कपूर
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आणखी एक महात्मा गांधी हवे - शेखर कपूर
भाषा
मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्याने व्यथीत झालेले अभिनेता व निर्माता दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सांगितले की, गृहमंत्रींनी राजीनामा दिल्याने भारतामध्ये निर्माण झालेल्या स्थितीत कुठल्याच प्रकारचा परिणाम होणार नसून देशाला आणखी एका महात्मा गांधींची आवश्यकता आहे.

गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा किंवा खाजगी वृत्तवाहीन्यांवर सुरू असलेली नेतेपुढार्‍यांची शाब्दीक चकमकीतून कुठलाच मार्ग निघणार नेसून उलट यातून आल्याच राष्ट्राला धोका आहे. कोणीच बदलण्यास तयार नसून परिवर्तन घडवून आणण्याची हिम्मत पोकळ राजकारण्यांमध्ये नाही. राजकारण्यांच्या शितयुध्दात निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. त्यांना न्याय कोण देणार हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे, असे परखड लेखन शेखर कपूर यांनी त्यांच्या ब्लॉगवर केले आहे.

भारतात निवडणुका घेऊन देखील परिवर्तन शक्य नाही. देशाला स्वातंत्र मिळवून आज आपण 60 वर्ष पूर्ण केले आहेत परंतु आजपर्यत सामान्य जनतेचे रक्षण करण्यात सरकारारला यश आलेले नाही.

शेखर यांच्यामते परिर्वतन आशेच्या किरणातून होते. भारतात मोठ्या संख्येने नागरिक निराशावादी आहेत. आपल्या राजकीय व्यवस्थेची एक शोकांतिका अशी की, ते देशवासियांमध्ये आशावाद निर्माण करण्यात असमर्थ ठरले आहे. आता भारताला एक अशी व्यक्ति पाहिजे की, ती नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण करू शकेल.

भारताला आणखी एका महात्मा गांधींची गरज आहे. भारतात आज चांगला नेता निवडण्याची वेळ आता आली आहे. असा नेता की, तो निरपक्ष असावा आणि त्यामध्ये भारतवासियांमध्ये आशावाद निर्माण करण्याची कुवत असावी.
संबंधित माहिती शोधा
आणखी
विवादास्पद वक्तव्यामुळे नकवी अडचणीत
आसाममध्‍ये रेल्‍वेत स्‍फोट, 2 ठार
शहिदाचे घर नसते तर कुत्राही गेला नसता
दाऊदच्या साथीदाराला 14 दिवसांची कोठडी
सोनियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नकोत
एअर इंडियाची तिकीट दरात कपात