मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत आणि पाकमध्ये निर्माण झालेल्या तणावाला कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकी सरकार करत असून, दहशतवादाच्या या लढाईत अमेरिकी लष्करही भारताच्या पाठीशी असल्याचे मत भारतात आलेल्या अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकी सैन्याचे प्रमुख एडमिरल मायकेल मुलेन स यांनी आज संरक्षण मंत्री एंटोनी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
मुलेन आणि त्याच्या सहकारी अधिकाऱ्यांनी काल पाकमध्ये झरदारींची भेट घेतली होती, यानंतर ते आज भारतात आले.
भारत आणि पाकने आशियातून दहशतवाद मिटवण्याचे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यानंतर मुलेन यांनी व्यक्त केले आहे. |