मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > रशियन अध्यक्षांचे भारतभेटीवर आगमन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रशियन अध्यक्षांचे भारतभेटीवर आगमन
रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदव्हेदेव यांचे तीन दिवसीय भारतभेटीवर आगमन झाले आहे. संरक्षण आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य दृढ करण्याचे त्यांच्या अजेंड्यावर आहे.

नवी दिल्लीतील भेटीदरम्यान आंतरराष्ट्रीय आणि सीमापार दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी घनिष्ठ द्विपक्षीय आदानप्रदानाचा मुद्दा अजेंड्यावर प्रमुखपणे येण्याची शक्यता आहे. यादरम्यान बहुतांश कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या होतील.

तमिळनाडूतील कंदकलम येथील अणुप्रकल्पाचे ठिकाणी आणखी चार अतिरिक्त अणुऊर्जा संयत्र बांधण्यासाठी दोन देशांदरम्यान करारही होण्याची शक्यता आहे.

भारतीय अणुऊर्जा प्रकल्पास इंधन पुरवठ्यासाठी यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या करारानुसार पुरवठ्यासाठी सहमतीपत्रावर स्वाक्षरी यावेळी करण्यात येईल.
संबंधित माहिती शोधा
आणखी
कोलकाता-बँकॉक हवाईसेवा उद्यापासून पूर्ववत
अमेरिकी लष्कर भारताच्या पाठीशी
हल्ल्यांचा बदला घ्या- भाजप
आंध्रात एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात
देशातील विमानतळांवर कडेकोट सुरक्षा
नंदीग्राम हिंसाचारात 12 जखमी