मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यात आयएसआयचा सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशिक्षण देणार्यांची नावे आणि प्रशिक्षणाची ठिकाणाही सरकारला माहिती आहेत. अमेरिकेकडे यापेक्षाही अधिक पुरावे असून त्यांनी भारतास त्याबाबत अवगत केले आहे.
अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष ऍडमीरल माइक मलेन यांनी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे सिद्ध करणारे भक्कम पुरावे असल्याचे पाकिस्तानला ठणकावले आहे. |