अमेरिकेतील ९/११ हल्ल्याप्रमाणे भारतात हवाई दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा परिस्थितीच्या आढाव्यासाठी केंद्राने आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
मंत्रिमंडळ सचिव के एम चंद्रशेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख, कोस्ट गार्ड, इंटेलिजन्स ब्युरो आणि रिसर्च अँड ऍनालिसीस विंग यासारख्या संस्थांच्या प्रमुख उपस्थित होते.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी लष्करी दलांना जमीन आणि सागरी सीमेवर पहारा वाढवण्याचे आदेश दिल्यानंतर ही आढावा बैठक घेण्यात आली आहे.
|