समाजवादी पक्ष आणि सपुआ सरकारमधील घटक पक्षांना दुलर्क्षित केल्याचा आरोप करत सपा व्यापक धर्मनिरपेक्ष आघाडी उभारण्याची शक्यता धुंडाळत आहे.
यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती, तृणमुल कॉंग्रेस यासारक्या पक्षांचा समावेश राहणार, असे सपाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी सांगितले.
याबाबत धोरणनिश्चितीसाठी एक दोन दिवसात राकॉपाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहोत. ममता बॅनर्जीशीही बोलणे झाले आहे. कॉंग्रेस कोणत्याही प्रश्नी आम्हांस विचारात घेत नाही. घटक पक्षांनाही दुलर्क्षित करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.
|