नोएडातील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी समाजवादी पार्टीन नऊ तारखेला नोएडा बंद जाहीर केला आहे.
पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींना कडक शासन करण्याची मागणी सरकारकडे करण्यात येईल.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींवर टीकेची झोड उडवतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. मायावतींच्या राज्यात महिलाच सुरक्षित नसल्याचेही ते म्हणाले. |