सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या अधिकार्यांनी सुरु केलेल्या संपा विरोधात सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सरकारने 67 अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच महाराष्ट्रासह चार राज्यात एस्मा लागू केला आहे.
पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस सचिव आर.एस.पांडेय यांनी सांगितले की, ओएनजीसीतील संपात सहभागी झालेल्या 64 तर इंडियन ऑईल कॉपरेशनमधील तीन अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलची टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात एस्मा लागू करण्यात आला आहे. |