राजीव गांधीच्या पावलांवर पाऊल टाकीत राहुल गांधी देशाचे युवा पंतप्रधान होतील, असे मत परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांन व्यक्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणूक पाहता मुखर्जी यांचे वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.
सातव्या प्रवाशी भारतीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना मुखर्जी म्हणाले की, महत्वपूर्ण पदे युवकांना देण्याची भारताची परंपरा आहे. प्रफुल्ल कुमार महंत केवळ 30 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. उमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. तसेच राजीव गांधीही 40 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. राहुल गांधीच्या माध्यमातून त्याची पुनरावृत्ती होवू शकते. |