सार्वजनिक क्षेत्रातील तेल अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार आणि संपावर असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठक रात्री उशीरापर्यंत चालली, परंतु यातून काहीही निष्पन्न न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर देशात भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, देशातील ट्रक मालकांनी संप पुकारल्याने आधीच इंधन मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत, यातच आता तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा संपही सुरूच राहिल्याने याचा विपरीत परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांना वाटत आहे. संपावर गेलेल्या 70 अधिकाऱ्यांना सरकारने निलंबित केल्याने याप्रकरणी चर्चेत अडचण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांच्या संघटनांनी स्पष्ट केले आहे. |