आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारलेल्या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये संपावरून उभी फूट पडली असून, भारत पेट्रोलियमचे अनेक अधिकारी पुन्हा कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी झालेली बैठक फिसकटल्यानंतर संपामुळे देशात अराजकता माजण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर आज भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा काम सुरू केल्याने संघटनांमध्ये असलेले मतभेद उघड झाले आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही तासांपूर्वीच संपावर गेलेल्या अधिकाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. याचा परिणाम दिसून येत असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. |