बांग्लादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचा संकेत देताना गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तेथील नागरिकांना भारतात विना परवानगी राहण्याचा हक्क नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय बांग्लादेशींना मोठ्या प्रमाणावर दिल्या जात असलेल्या व्हीसावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अधिक जागृत भूमिका घेतलेल्या चिदंबरम यांनी बांग्लादेशींचया व्हीसाची मुदत संपल्यानंतर त्यांना परत पाठविण्यासाठी यंत्रणांनी सावध राहण्यास सांगितले आहे. |