राजस्थानमध्ये कथितरीत्या तिरंगा विकणाऱ्या दोन कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कृषी व विपणन मंडळ, भरतपूरचे हे दोघे कर्मचारी आहेत.
लिलावात भंगारासोबत तिरंगा विक्रीत सहभागाबद्दल त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. याप्रकरणी कार्यकारी अभियंता देवेंद्र पाल सिंह व भांडारप्रमुख दाऊ दयाल बंसल हे दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
यासाठी जनरल के सी मिना यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. |