झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन आणि उपमुख्यमंत्री मरांडी या दोघांनी राजीनामे दिल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी लोकशाही आघाडीचे कार्यवाह संयोजक आणि जनतादल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी केली आहे.
झारखंडमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आणि कोणतीही पार्टी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यास तयार नसल्याने राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नसल्याचे यादव म्हणाले. |