गुजरातमधील जनता संक्रांतीचे पतंग उडवण्याचा आनंद लुटत असतानाच दुसरीकडे मोदींच्या विकासाचा पतंगही गुजरातच्या आकाशात आज उंचावर गेला.
गुजरातमध्ये आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय गुजरात ग्लोबल इन्व्हेसमेंट समीट 2009 च्या पहिल्या दिवशी 7,48,970 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योगांनी आघाडी घेतली असून, या माध्यमातून आठ लाख जणांना रोजगार मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या संमेलनाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यात मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह अनेक उद्योगपती सहभागी झाले होते. मुस्लिम देशांचाही सहभाग गोध्रा प्रकरणानंतर जातीय दंगलींमुळे बदनाम झालेल्या गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज अनेक मुस्लिम देशांनीही आपला रस दाखवला. या देशांमध्ये अरब अमीरात, ओमान, इराण, मालदीव, गनई, इंडोनेशिया यासह अनेक देशांनी आपला रस दाखवला आहे. |