उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पार्टीविरोधात भारतीय जनता पार्टीने आंदोलन पुकारल्यानंतर आता समाजवादी पार्टीनेही 11 फेब्रुवारी रोजी राज्यात जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
समाजवादी पार्टीचे खासदार रेवती रमण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजले असून, सरकार साऱ्याच मोर्च्यांवर अपयशी ठरल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील अनेक मंत्री आणि अधिकारी स्वतः:चे खिसे भरण्यात गुंतले असून त्यांना जनतेचे काही घेणेदेणे असल्याचे ते म्हणाले. |