राज्यात बर्ड फ्ल्यूमुळे आतापर्यंत सरकारने जवळपास पाच लाखांवर कोंबड्यांना ठार मारले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात बर्ड फ्ल्यूने थैमान घातले असून, यामुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोंबड्यांना मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 230 कर्मचाऱ्यांना या कामी नेमण्यात आले असून, त्यांनी पाच लाख कोंबड्यांना ठार मारले आहे. |