प्रसिद्ध चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास पोलिसांनी लावला असून, चोरीस गेलेला माल आणि तीन चोरांना पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला आहे. मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज पत्रकारपरिषदेत याविषयी माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी सुरक्षा रक्षकांसह दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाला उत्तर प्रदेशात तर एकाला मुंबईत पकडण्यात आल्याचे मारियांनी स्पष्ट केले. अटक करण्यात आलेल्यांकडून पोलिसांनी सात लाख रुपये हस्तगत केले आहेत. |