लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पक्षांतर्गत आव्हान देणाऱ्या माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने आपला पाठिंबा जाहीर करत भाजपाला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी शेखावत यांच्या निर्णयाचा आदर करणे गरजेचे असून, ते भारतीय राजकारणात महत्त्वाचे नेते असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी पी त्रिपाठी यांनी व्यक्त केले आहे. शेखावत हे उपराष्ट्रपती होते, तरी ते आता लोकसभा निवडणूक लढवू शकतात, यात घटनात्मक अडचण नसल्याचेही त्रिपाठी म्हणाले. शेखावत यांना राष्ट्रवादी कॉग्रेसचा पाठिंबा असून, इतर पक्षाकडूनही त्यांना समर्थन मिळवून देण्याचा पक्ष प्रयत्न करेल असे आश्वासनही त्रिपाठी यांनी दिले आहे. |