मुंबईवर झालेला हल्ला हा भारतावर झालेला हल्ला असून, पाकला धडा शिकवण्यासाठी आता भारताने पाकवर हल्ला करावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख कुप्प सी सुदर्शन यांनी केली आहे. देशात वाढत्या हल्ल्यांना रोखण्यात सरकारला अपयश आले असून सरकारच्या दहशतवादविरोधी धोरणावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. पाकने आतापर्यंत भारताचे मोठे नुकसान केले असून, पाकवर हल्ला करण्याची हीच योग्यवेळ असल्याचे ते म्हणाले. भाजपमध्ये सुरू असलेल्या शेखावत वादावर बोलण्यास मात्र त्यांनी यावेळी नकार दिला. |