आज साऱ्या जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असून, याला केवळ अमेरिकेचे आर्थिक मॉडलच जबाबदार असल्याचा आरोप करत मंदीच्या काळात केवळ गांधीगिरीच तारू शकते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख कुप्प सी सुदर्शन यांनी व्यक्त केले.
देशातील विकास केवळ शहरांपुरताच मर्यादित राहिला असून, गावाकडे आतापर्यंत प्रत्येक सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे सुदर्शन म्हणाले.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आयोजित स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमानंतर पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
आज अमेरिकेमुळे जगाचाच आर्थिक विकास रखडला असून, आता गांधीजींनी राबवलेल्या आर्थिक विकासाचे मॉडेल प्रत्येक देशाने अनुसरावे त्याने देशात रोजगारही वाढेल आणि पर्यावरणाचे रक्षणही होणार असल्याचे सुदर्शन यांनी स्पष्ट केले. |