कॉंग्रेसकडून प्रियांका गांधींना निवडणूकीच्या आखाड्यात उतरवण्याचा आग्रह होत असून त्या लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास पक्षासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांना मोरादाबाद येथून निवडणूक लढवण्याची मागणी होत आहे. यांवर स्थानिक पातळीवरून अशी मागणी असल्यास पक्षनेतृत्वाने यावर विचार करावा, असे पक्षप्रवक्तत्या जयंती नटराजन यांनी स्पष्ट केले आहे.
प्रियांका गांधीची इमेज लक्षात घेता त्यांनी निवडणूक लढवणे पक्षासाठी लाभदायकच ठरेल, असा विश्वास नटराजन यांनी व्यक्त केला. महिला व तरूणांमध्ये त्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. |