दहशतवाद्यांना मुंबईतील किनाऱ्यांवर उतरणारा पाहणारी एक महिला साक्षीदार बेपत्ता झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कफ परेडवर दहशतवाद्यांना उतरताना पाहणारी अनिता उदैय्या 11 जानेवारी पासून बेपत्ता असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. यापूर्वी अनिताला पोलिसांनी जे जे रुग्णालयात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नेले होते. मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे हे मृतदेह होते. यानंतर ती राहत्या घरातून गायब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. |