सरकारने पेट्रोलच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातील अधिकृत घोषणा गुरुवारी केली जाण्याची शक्यता आहे. डिझेल, पेट्रोलसह घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीतही कपातीची शक्यता पेट्रोलियम मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
त्यानुसार पेट्रोलमध्ये 5, डिझेल 3 तर गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपये कपात केली जाणार आहे. |