झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना आज अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
सोरेन झारखंडमधील तमाड विधानसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी कालच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असतानाच आज त्यांना अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट कले आहे. |