लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष चक्रवर्ती यांनी सचिव विमान बोस यांना पत्राद्वारे सोमनाथदांना स्वगृही बोलावण्याची शिफारस केली आहे.
माकपा नेते सीताराम येचुरी यांनी मंगळवारी सांगितले, की राज्य समितीकडून अशी शिफारस आली तर तसा विचार केला जाईल. माकपाने अणू कराराच्या मुद्यावरून संपुआचा पाठिंबा काढून घेतल्यानंतरही सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले होते. |