दहशतवाद हा संपूर्ण जगाला सतावणारा रोग आहे. तो संपविलाच पाहिजे. मुंबई हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारताला मोठा पाठिंबा मिळाला आहे. हा हल्ला केवळ भारत आणि पाक संबंधांवरील विषय नसून तो आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा प्रकार आहे, असे परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज स्पष्ट केले आहे. मुंबई हल्ल्यानंतर एका नियमित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. |