पुरावे देऊनही पाकिस्तानने दहशतवादा विरोधात भारताची मदत केली नाही तर पाकसोबतचे संबंध संपुष्टात येऊ शकतील, असे संकेत गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिले आहेत.
पाकने सहकार्य केले नाही तर त्यांच्यासोबतचा आयात-निर्यात व्यवहार बंद केला जाईल. तसेच पय्रटन संबंधही संपुष्टात आणले जातील. पुन्हा-पुन्हा पुरावे देऊनही पाकने आतापर्यंत काहीही सहकार्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी भारताने अद्याप पक्के पुरावे दिले नसल्याचे म्हटले आहे. |